आणि ती तिन्हीसांजेची वेळ होती...

  आज मला अगदीच सकाळी सकाळी जाग आली.रोज तो अलार्म घसा कोरडा होईपर्यंत ओरडतो.आणि, मला जाग करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आज कस काय मला जाग आली कोणास ठाऊक?
विचारांचा खेळात मी किचन मध्ये आले, कॉफी बनवली आणि कधी न पाहिलेल्या,कधी न अनुभल्येला सूर्याचा नाजूक किरणांचा नवीन अनुभव घेण्यासाठी मी गॅलरी मध्ये येऊन पोहचले.त्या गरम कॉफी चा चटक्यापेक्षा मला सूर्याचा नाजूक कोवळ्या ऊनाचा स्पर्श जास्त आनंद देत होता.
पण जशी जशी वेळ जात चालली होती, तशी तशी सूर्याची किरणे प्रखर होत चालली होती.असे वाटत होते की त्याचा मनात भयंकर राग होता.त्याला त्याचा प्रखर रागाबदल विचारण्याची माझ्यात धमक नव्हती.पण, काय करणार त्याक्षणी माझी सोबत म्हणून फक्त तो सुर्य होता.त्यामुळे एक मोठा आवांढा गिळून मी त्याला विचारले.
काय रे! इतका का रागवला आहेस?
पण तो काहीच बोलू इच्छित नाही याची जाणीव मला होऊ लागली,मग मी माझेच ठरवले आणि सुर्यासोबत एकतर्फी संवाद साधू लागले.
काय रे मित्रा का रागवला आहेस? एकटे वाटण्याचे दुखः आहे का राग हे तरी सांग,कारण माझे काही असेच आहे.पण मी काय तुझ्यासारखं रागवत बसू का?
पण त्याचा बाजूने काहीच प्रतिसाद येत न्हवता; तो त्याचा प्रखरतेनेच मला प्रतिउत्तर देत असावा बहुतेक!
मग मी त्याची समजूत काढायची ठरवली. पण घड्याळाकडे बघताच क्षणी मला माझा खऱ्या आयुष्याची आठवण झाली.मग,मात्र मला सूर्याचा निरोप घ्यावा लागला.पण,जात असताना त्याची समजूत मी नक्की काढेल असे आश्वासन देऊन मी माझा दैनंदिन कामाचा सुरवातीस निघाले.
तिन्हीसांजेला मी घरी परतले.
माझा थकवा घालवण्यासाठी मी बेसिन कडे जाऊन पाण्याचे पुष्कळ शिंतोडेे तोंडावर मारले.आणि,किचन मध्ये जाऊन कॉफी बनवली.ती बनवता च मला सूर्याची आठवण झाली.आणि,मी पुन्हा गॅलरी मध्ये येऊन पोहचले.आणि आता मला त्याचाकडून प्रखरता नव्हे तर एक कोमल,मंद झुळूक जाणवत होती.आणि ती इतकी लोभसवाणी होती की, माझा थकवा त्या पाण्याचा थेंबांनी नव्हे तर त्या मंद झुळूकेमुळे निखळून पडला.
त्याचे असे रूप बगून त्याची कोणीतरी समजूत काढली असावी असे भासत होते.मग त्याला समजावण्याचा स्वरात मी  पुन्हा सूर्यासोबत गप्पा मारू लागले.
"तू कितीही रागवल्याच नाटक कर पण संध्यााळपर्यंत तुझे रूप मोहरुन येते.असा कसा रे तू? तुला कोणाची साथ लाभली की काय हे तरी कळू दे?"
(सूर्याचा  स्वभावाचे बीजगणित मी सोडवण्याचा प्रयत्न करत होते.आणि अचानक सूर्याच्या मंद वाऱ्याची झुळूक हळुवार माझा प्रश्नाला उत्तर म्हणून बोलू लागली.)
"मला कोणाचा अस्तित्वाची किंवा कोणाचा साथीची गरज नाही ग! मी जेव्हा उगवतो तेव्हा माझा साथीला प्रखरता असते,तेज असत आणि,माझ्या मावळण्याचा वेळी माझा सोबत एक सुखद गारवा असतो,त्याची साथ असते."
 गरम कॉफीचा एक घोट घेत,त्या तिन्हीसांजेचा सूर्याकडे एकटक बगत राहिले.आणि डोक्यात विचारचक्र चालू झाली.ती झुळूक,तो कॉफी चा घोट,आणि ते विचारचक्र च जणू माझा साथीला होते,माझा गाठीला होते.आणि,याच गोष्टी माझा एकटेपणा नाहीसा करत जात होत; हे मात्र नक्की!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मुखवटा