Posts

Showing posts from January, 2018

आणि ती तिन्हीसांजेची वेळ होती...

  आज मला अगदीच सकाळी सकाळी जाग आली.रोज तो अलार्म घसा कोरडा होईपर्यंत ओरडतो.आणि, मला जाग करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आज कस काय मला जाग आली कोणास ठाऊक? विचारांचा खेळात मी किचन मध्ये आले, कॉफी बनवली आणि कधी न पाहिलेल्या,कधी न अनुभल्येला सूर्याचा नाजूक किरणांचा नवीन अनुभव घेण्यासाठी मी गॅलरी मध्ये येऊन पोहचले.त्या गरम कॉफी चा चटक्यापेक्षा मला सूर्याचा नाजूक कोवळ्या ऊनाचा स्पर्श जास्त आनंद देत होता. पण जशी जशी वेळ जात चालली होती, तशी तशी सूर्याची किरणे प्रखर होत चालली होती.असे वाटत होते की त्याचा मनात भयंकर राग होता.त्याला त्याचा प्रखर रागाबदल विचारण्याची माझ्यात धमक नव्हती.पण, काय करणार त्याक्षणी माझी सोबत म्हणून फक्त तो सुर्य होता.त्यामुळे एक मोठा आवांढा गिळून मी त्याला विचारले. काय रे! इतका का रागवला आहेस? पण तो काहीच बोलू इच्छित नाही याची जाणीव मला होऊ लागली,मग मी माझेच ठरवले आणि सुर्यासोबत एकतर्फी संवाद साधू लागले. काय रे मित्रा का रागवला आहेस? एकटे वाटण्याचे दुखः आहे का राग हे तरी सांग,कारण माझे काही असेच आहे.पण मी काय तुझ्यासारखं रागवत बसू का? पण त्याचा बाजूने काहीच प्रत...

मुखवटा

आज कॉलेजमध्ये काही भलताच प्रकार घडला.निखिल आणि अविनाशमध्ये अचानक बाचाबाची सुरू झाली,ती दोघे एकमेकांना 'तू खोटा आहेस,तुझा चेहरा खोटा आहे'अश्याप्रकरे एकमेकांना बोलू लागले.आणि यानंतर निखिल न माझं मन आणि डोक अडगळीच्या खोलीत बंद वाव तशी परिस्थिती होईल अस वावग बोलून गेला...'तू तुझ्यातल्या "मी"ला जगापासून लपवतोस'... आणि या वाक्यानंतर माझ डोक चालेना, हा "मी" कोण?आणि हा निखिल कोणत्या "मी"बद्दल बोलतोय?मला काही उमजेना,आणि याचा विचार करत माझी दुपार कशी ओलांडली मला कळलंच नाही. घरी आल्यावर मी हाच विचार करत बसले की माझ्यामध्ये सुद्धा हा "मी" असेल का?पण या "मी"ची नक्की व्याख्या काय? डोक्याला थोडा ताण देऊन मी एका विचारावर पोहचले आणि माझ्या "मी" ची मी स्वतचं एक व्याख्या तयार केली. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे एक व्यक्तिमत्त्व असते.त्याचे विचार, त्याचा कल्पना असतात,त्याची जीवनशैली या सर्व मुल्यांच्या आधारावर त्या व्यक्तीमधील "मी" तयार होतो.त्या 'मी'ची जडणघडण होते. पण कोणताही व्यक्ती आपल्यातल्या "मी" ...