आणि ती तिन्हीसांजेची वेळ होती...
आज मला अगदीच सकाळी सकाळी जाग आली.रोज तो अलार्म घसा कोरडा होईपर्यंत ओरडतो.आणि, मला जाग करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आज कस काय मला जाग आली कोणास ठाऊक? विचारांचा खेळात मी किचन मध्ये आले, कॉफी बनवली आणि कधी न पाहिलेल्या,कधी न अनुभल्येला सूर्याचा नाजूक किरणांचा नवीन अनुभव घेण्यासाठी मी गॅलरी मध्ये येऊन पोहचले.त्या गरम कॉफी चा चटक्यापेक्षा मला सूर्याचा नाजूक कोवळ्या ऊनाचा स्पर्श जास्त आनंद देत होता. पण जशी जशी वेळ जात चालली होती, तशी तशी सूर्याची किरणे प्रखर होत चालली होती.असे वाटत होते की त्याचा मनात भयंकर राग होता.त्याला त्याचा प्रखर रागाबदल विचारण्याची माझ्यात धमक नव्हती.पण, काय करणार त्याक्षणी माझी सोबत म्हणून फक्त तो सुर्य होता.त्यामुळे एक मोठा आवांढा गिळून मी त्याला विचारले. काय रे! इतका का रागवला आहेस? पण तो काहीच बोलू इच्छित नाही याची जाणीव मला होऊ लागली,मग मी माझेच ठरवले आणि सुर्यासोबत एकतर्फी संवाद साधू लागले. काय रे मित्रा का रागवला आहेस? एकटे वाटण्याचे दुखः आहे का राग हे तरी सांग,कारण माझे काही असेच आहे.पण मी काय तुझ्यासारखं रागवत बसू का? पण त्याचा बाजूने काहीच प्रत...